Skip to main content

(भाग – ४) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel


प्रबळगडाच्या माथ्यावरील निसर्गाचा आल्हादायक क्षण मनात साठवत होतो. बरोबर दुपारी १. १५  वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. काळे ढग वातावरण बदलवत होते, भराभर पावले टाकत सर केलेली खिंड उतरविण्यास सुरुवात केली. पाय लटलटत होते.  हातातील शेवरीची काठीच आमच्यासाठी वरदान होती, तिचा आधार घेत अवघड खिंड सावकाश उतरत होतो. कठीन उतार बसत बसतच उतरत होतो.

 प्रज्वल फुल सेफ्टी मध्ये, पूर्ण खिंड बसूनच उतरला. पिल्या, अजिंक्य फुल जोशातच!!! सर्वांच्या पुढे. पपु काका आणि मी मागे पुढेच होतो, एकमेकाकडे पाहत, पायांच्या व्यथा हसून व्यक्त करत. "चलते  रहो". ब्रह्म काका, पपू काकांच्या मागेच, विथ नो इमोशन्स!!!. बब्बू जजमेंट मध्ये उतरत होता, काठी न घेता. चाललही असते, पण नंतर बाल्या नाच करत उतरु लागला. मी आवाज दिला, 'नीट उतर, परत आणणार नाही". बाल्या नाच लगेच संपला. 

तोवर, जवळ जवळ ५० ते ६० जणांचा असे कॉलेजचे २ ग्रुप घेऊन निलेशचे दोन भाऊ गड सर करत होते.  बर्यापैकी मुलीच जास्त होत्या. आमची आणि त्यांची भेट खिंडीच्या अर्ध्यावर झाली. त्यातील काहीजण आम्हाला विचारायचे, "अजून किती वर आहे?" "किती वेळ लागेल?" पुढे अजून अवघड आहे का?  हे प्रश्न म्हणजे आलेला जबरदस्त मानसिक आणि शारीरिक थकवाच. मनोबल, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, धैर्य या सर्व गोष्टींचा झालेला पाचोळा. आम्ही मात्र फुल खूष! आम्ही गड सर करून खाली उतरत होतो. मनोबल, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, धैर्य  आम्ही अनुभवले होते. आता वेळ त्यांची होती.  त्यांच्या प्रश्नांची उत्तरे, आम्ही  आनंदाने देत होतो. पपू काका या सेवेत अखंड बुडाले. त्या ग्रुपला खर बळ, काकांनीच दिले. एकीने काकांना प्रश्न केला, "अहो, मी जाऊ शकते का वर?" मी,  ५० वर्षाचा म्हातारा जाऊ शकतो, तूला काय  झाल, न जायला" पोरगी गपच झाली, वयाचा अंदाज बांधत, मुकाट्याने गड चढू लागली. 

अंदाजे! पाऊन तासात गड उतरलो होतो. गड सर केल्याचा आनंद चेहऱ्यावर होताच, पण पायात जान नव्हती. आधाराला शेवरीची काठी होती म्हणून जल्ल बर!  उतरतोय…उतरतोय… आली पायवाट. घामाने सर्व अंग चिंब भिजले होते. दुरूनच कौलारू घरे दिसु लागली. कधी जाऊन त्या रूम वर अंग टाकतोय असे झाले होते. काही वेळातच रूमवर. रूमची ती शेवटची पायरी चढताना, दोन्ही हातांना कठड्याचा आधार घ्यावाच लागला, आय शपथ!! म्हणत, अंगणातच स्वत:ला सर्वांनी झोकून दिले. कसेबसे पायातील शूज काढले, ओलाव्यामुळे पाय गोरेपान झालेले, बोटे एकमेकाला चिकटूनच. मांडी घालून, तर कधी आडवे होऊन, रीलेक्स मोड वर अंगणात पहुडलो. अंगणातून दिसणाऱ्या प्रबळगडाचे टोक न्याहरत होतो, "ते काय, आम्ही तिकडेच होतो, त्या टोकावर". 


(डाव्या बाजूला कलावंती दुर्ग तर उजवेस प्रबळगड!!!! )

भुकेने पोटात काहूर माजले होते, चकलीचे एक पाकीट हाती लागले, फडश्याच उडाला त्याचा. भुकेने तोंड सुकलं होत, सासूच्या तिळाच्या चटणीची आठवण झाली, एका उडीत डबा घेऊन आलो. चिमटी… चिमटी… तोंडात टाकली, अप्रतिम चव. थोडी हुशारी अंगात संचारली. मामा चटणीचे गोडवे गाऊ लागले, चक्क "सासूची चटणी… सासूची चटणी…. " गाणे म्हणत चिमटी तोंडात टाकत होते. यापुढे 'तिळाची चटणी', "सासूची चटणी"  म्हणून ओळखण्यात येईल का काय?, असे वातावरण तयार झाले. 

जेवणाआधी आंघोळ करणे भाग होते. परेशने पारंपारिक पद्धतीवर जोर दिला, सरळ आंघोळीला बालटी घेऊन थेट बाथरूम गाठले. प्रज्वल, पिल्या, अजिंक्य व रोहितने ओढा गाठला. मी, बब्बू, पपु काका, मामा, ब्रह्म काका आणि फ्रेश परेश प्रबळमाचीवरील त्या हॉटेल मध्ये जेवणास जाण्यासाठी निघालो. तोपर्यंत यंगीस्थान आंघोळ करून फ्रेश झाला होता. वाहत्या ओढ्यात मी व बब्बू. आम्ही थंडगार पाण्यात आंघोळीचा आनंद लुटला. आंघोळ करून पोट पूजा करण्यासाठी निघालो. 

इकडे तोवर, गरमागरम भाकरी व पिटले तयारच होते, त्याच्या बरोबर चिकन प्लेटची ऑफर लावली होती. मग काय जेवणाची तारीफ  करत, पोट भरून जेवलो. मस्त जेवलो सर्वजण!!!. आता थकवा नाहीसा झाला होता. संध्याकाळचे ५ वाजून गेले होते. रूम वर जाऊन थोडा आराम करण्याचे ठरले. जाताना रात्रीच्या जेवणाचा बेत ठरवला, गावठी चिकन, भाकरी, भात. व जेवण घेऊन रूम वरच आणण्यासाठी विनंती केली.  हॉटेल व रूम यांच्यात अंतर होते. रात्री जेवणास येणे व परत जाणे गैरसोयीचे ठरले असते, आमची विनंती त्यांनी मान्य केली. धर्मा दादा बरोबर परत पायपीट सुरु केली. 

६ वाजता, रूमवर आलो. धर्मा दादाला त्याच्या सेवेचे मानधन देऊन, त्यांचे आभार मानून, आमच्या सेवेतून मुक्त केले. 

अंगणात, यांगिस्थान फुल जोशात होते. रिकामी बिसलेरी बॉटल घेऊन हे बहाद्दर फुटबॉल खेळू लागले. नशीब द्राक्ष नव्हतो घेऊन गेलो. खेळ जोरात चालला होता. प्रज्वल आणि पिल्या तर इकडे अजिंक्य व रोहित. अधून मधून टीम चेंज.  नेहमी सायलेंट मोड वर असलेला रोहित या खेळात खूपच प्ले मोड वर होता. पिल्या सर्वांना भारी पडत होता. गोल वर गोल करत होता. आम्ही प्रेक्षक होतो, टाळ्यांचा पाऊस पाडत होतो. मी आणि परेश उतरलो पीच वर. ब्रह्म काका व पपू काका गोलकीपर. आमची टीम पाडतोपर्यंत पपु काका विश्राम अवस्थेत वार्मअप करण्यात बिझी झालेले. एकदाची टीम फिक्स करून, केला चालू फुटबॉ(ट)ल. आता प्रेक्षक फक्त मामाचं होते. मी टीवीवर फुटबॉल सुद्धा कधी पाहत नाही, आज खेळत होतो. पिल्या व परेश आम्हांला भारी पडत होते, गोल वर गोल करत होते. एक पण गोल केला नाही आम्ही. आला ना राग, गोल पायाने मारून जमणार नाही, हे ओळखून खाली बसलो, बॉटल घेतली हातात, थेट फेकली, आणि हा गोल. गोल मारून उठलो, मागे पाहतो तर काय. बब्बू   गोल किपिंगवर कोसळला होता, परेश आडवा झालेला. पिल्या, प्रज्वल, अजिंक्य यांची हसून हसून पुरती वाट लागली होती. शेवटी सर्वांनी मला मेन ओफ द सिरीज देऊन, खेळ आटोपला. हो काढले फोटो!! 








पायपीट, नंतर हा खेळ, खूपच दमलो होतो. मी आणि परेश बेडवर आडवे झालो, डोळे बंद करण्याच्या आतच घोरू हि लागलो. रात्री ९ च्या दरम्यान उठून उभा राहिलो, आता वेळ होती ठरविल्याप्रमाणे शेकोटी करण्याची. पिल्याला घेतले, रुमच्या मागील एका घरात गेलो. तेथील घर मालकांनी शेकोटीसाठी, एक पत्रा,  थोडी लाकडेही दिली, आमच्या बरोबरच आले आणि आम्हाला शेकोटी करूनही दिली. "अजून काय लागले कि सांगा", असे बोलत आमचा निरोप घेतला. 

रात्रीचे ९.३० वाजून गेले होते, थंडी जोर धरत होती. पावसाची ये-जा चालू होती. शेकोटी जवळ गोल करून शेकत बसलो. रात्री ११.०० च्या दरम्यान, निलेशचे वडील, आई व भाऊ जेवण घेऊन आले. भूक होतीच, पोरांनी जेवण उरकून घेतले, मग आम्ही. सिनिअर सिटीजन जेऊन हळू हळू निद्रावस्थेत गेले. पोरही एकमेकाच्या कुशीत सामावली. मी, परेश व निलेशचा भाऊ २ वाजेपर्यंत शेकोटीजवळच गप्पा मारत बसलो. नंतर आम्हीही झोपी गेलो. 





























Comments

Popular posts from this blog

भाग १ - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड

राजगड - भाग १ Rajgad Trekking Experience in Marathi गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश. वार शुक्रवार, दिनांक ७/९/२०१२ रोजी, दुपारी २.३० वाजता तवेरा गाडीतून आमच्या सफरीला सुरुवात झाली. गाडी घणसोली तून निघून, ब्राम्ह् काका काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन काकांना घेतले, परत त्यांच्या  घरी म्हणजे तुर्भ्याला गेलो. तुर्भ्याला माझ्या सासुरवाडीतून माझ्या सासूने आमच्या प्रवासासाठी गोड पोळ्या बनविल्या होत्या त्या घेऊन,  ब्रम्ह काकांच्या घरी  त्यांची बेग घेतली, परेश आमची वाट पाहत तेथेच होता. दोघांना घेऊन गाडी कळंबोलीला रवाना झाली. तेथे सचिन आमच्या विनंतीला मान न देता त्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर राजगडावर येण्यास तयार झाला होता. त्याचे वडील त्याला म्हणाले होते, राजगडावर तू कदाचित जाशीलहि पण भावांबरोबर जाण्यात वेगळी मजा आहे, तू जा... सचिन आला. मला खूप

भाग - १... सफर वैराडगडची..

नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो.   आता सर करायचा होता वैराडगड.  सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा  गड.    मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली. २२/९/२०१२  वार शनिवार, साय. ६ वाजता  मी, माझी पत्नी मीना व माझी मुलगी गुड्डी चिपळूण वरून सातारा येथील जावली तालुक्यातील म्हसवे या गावी जाण्यासाठी क्वालीस गाडी सुरु केली. कोकणातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा भाताची शेती, पाऊस कमी झालेला तरीही कड्यावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या पाहत गाडी पुढे सरकत होती. गणेशोत्सव असल्याने अधून मधून सार्वजनिक गणपती बापांचे दर्शन होत होते,  अंधार वाढत होता, कुंभार्ली घाट क्रॉस केला, पाटण तालुका सोडला, उंब्रजचा ब्रिज पार करत एक्स्प्रेस वे ला लागलो. बरोबर रात्री ९ वाजता माझ्या सासुरवाडीत दरे करंदी या गावी पोहचलो. माझे साडू,  सागर, शेखर, संतोष आणि मयूर माझी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील बाप्पाचे व गोरीचे दर्शन घेतले,  ट्रेकिंग ला लागणारे सामान एका बेगेत घेतले, माझ्या एकुलत्या एक बायकोचा 

प्र..प्र..प्र..प्रबळगड

(भाग - १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel. प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पानी, तर कुठे साठलेले पानी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून. या वेळेला टीम मध्ये,  मी ,  पपु काका  (टीम कर्नल),  पिल्या  (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात),  अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश . तर फ्रेशर होते  रोहित, बब्बू   आणि खास असा  प्रज्वल . (खास म्हणजे..  मुलान  दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर, च्यायला तो असल्यावर मजाच वेगळी… आणि असायलाच हवी, इतिहासाच्या अभ्यासातील मैदानावरचा तो सचिन तेंडूलकरच. एकदम भारी.. गडावर निघण्याच्या सात दिवस अगोद