Skip to main content

(भाग – ३) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

(भाग – १) (भाग – २ )

ठाकूरवाडी गावातून ते प्रबळमाचीवर पोहचायला २ तास लागले होते. बरोबर सकाळी ११.०० वाजता राहण्याची सोय असलेल्या खोलीवर पोहचलो. खोलीच्या आजूबाजूला कौलारू घरे, जवळ जवळ १०-१२ असतील एकमेकाला चिकटून, चारी बाजूनी गर्द भल्या मोठ्या झाडांची संरक्षक भिंती, प्रत्येक घरात एक पाळीव रखवालदार, घरात लग्न सराई असल्यासारख्या गडबडीत चालणाऱ्या कोंबड्या, त्यांच्यावर आरवणारे मर्द  कोंबडे… सुंदरच!!! 

लांबलचक ३ खोल्यांचे ते छोटेस होटेलच, खास पर्यटकांसाठी!, पिवळ्या रंगाने रंगविलेल्या, समोरच मोठे आंगण, २ बाथरूम, कुठलीही गैरसोय होणार नाही याची घेतलेली पुरेपूर काळजी. बाळूने दरवाजा उघडून देऊन तो त्याच्या कामात व्यस्त झाला. आत, १ मोठा हॉल, २ बेडरूम, हॉलमध्ये एक बेड व २ सोफा खुर्ची. लगबगीने सर्व समान एक कोपऱ्यात ठेवल्या. काहीजण बेडवर कोसळले, पपु काका खुर्चीत आरामात. बाजूला सवंगडी, ब्रम्ह काका. 



खरी ट्रेकिंग इथूनच होती, माचीवरून आता प्रबळगड गाठायचा होता, धर्मा दादाच्या मते एकूण ३-४ तास लागणारे होते, परत यायला. 'सुका खोकल्याचा आवाज आला'.  तीन वाजपर्यंत सर्व परत येण्याचे एकमताने ठरले, शिवाय दुपारचे जेवणही ३ वाजताच घ्यायचे होते. "बाळू , तुला किती वेळ लागतो गडावर जायला, पपु काकांनी विचारले. "पाऊन तास". आम्ही सगळे चुपच. आम्ही अंदाज बांधला, "चला आपल्याला डबल वेळ लागेल". या गणिताचे मामांवर प्रबळ ताण पडला,  मामांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज, काकांना दिला. पोवाडा गात गात काकांनी अर्ज पास केला. तो सुका खोकला इथून होता वाटत!…. 

११.१५ वाजता आमचा ताफा गडावर जाण्यासाठी सज्ज. सुरु झाली ती प्रबळ ट्रेकिंग, प्रबळगडावर.  गाव सोडले, पायवाटेला लागलो, बाळ खेकड्यांचा सपाट जमिनीवर फर्स्ट गिअर, विदाऊट क्लच, फुल अक्सिलेटर  वर गाडी उचलून मधेच ब्रेक मारणे चालू होते. पक्षांचे सूर वातावरण जीवंत ठेवत होते. पायवाट ओलांडून, गडाच्या पायथ्याशी पोहचलो. काळीकुट्ट, भक्कम छाती बाहेर काढून प्रबळगड दिमाखात उभा होता. खिंड चढायला सुरुवात केली. काठीशिवाय चालणे मुशिक्ल होत होते, बुडत्यालाच काठीचा आधार कशाला, चढताना पण काठीचा आधार हवाच!. माझ्या जवळ शेवरीची काठी नसल्याची व्यथा ब्रम्ह काकांना सांगितली, मग काय लगेच शेवरीच्या झाडीत कूच, धार धार चाकूने आक्रमण, खणखणीत ३-४ काठ्या पेश.  











कधी खडकाळ खिंड, तर कधी रानवेलीतील पायवाट. एकमेकाला सावकाश, सावकाश बोलत स्व:तालाच आधार देत होतो. गुपचूप!.  वातावरण थंड असले तरी, कठीण चढाई असल्यामुळे, घाम मुद्दाम भिजवत होता, "एसीत बसता काय"… "घ्या आता!!"

अर्धा गड पार केला होता, परेशचा थकवा वाढला, २ -३ वेळा सरेंडर झाला. "चला १५ मीनीट बसा इथेच, मग खाली जाऊ", मी सांगितले. जबरदस्ती घेऊन न जाणे हे ठरविलेच होते. पण, आमचे यंगिस्तान मागे हटेना. "दादा, नाय जाऊया वर, हीच खरी ट्रेकिंग, ओजी (Original) ट्रेकिंग, हीच रिअल. पिल्या सर्वात भारी, मागे हटायचं नावच नाही, बस जायचच, आमची शिवकालीन घोरपडच ग ती.  हाच आपल्याला गडावर नक्की घेऊन जाईल. इकडे, पपु काकांकडे हळूच पाहायचो, आणि काय गोड हसायचे. व्हाट अ स्माईल, स्मूथ स्माईल, वाटत होते बोलावेसे "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो!! क्या गम हे जिसको झुपा रहे हो!". ब्रह्म काकांच्या चेहरा गडा सारखा प्रबळच, नो इमोशन्स (लक्ष्य,लक्ष्य,लक्ष्य)!  रोहित अजून सायलेंट मोड वरच! अजिंक्यचा, देव आनंद झाला होता, धबधब्याच्या शोधात "तू… कहा, ये बता…". म्हणत गड चढत होता. प्रज्वल आणि पिल्या "एक दुजे के लिये". परेश, गालावर कळी पडणारी प्रिती झिंटा, ती त्याची 'कळीस्वामिनीच'! चक्क तिच्यासारख्याच पोज कश्या देता येतील, याचा विचार करत आगेकूच करत होता. बब्बू …. प्रसंन्न, उत्साही, शो रुमच्या सर्व गाड्या, मालका सकट सेल केल्याचा आनंद त्याच्या डोळ्यात आणि चालण्यात भासत होता. आता मी, काही खास नाही… घोरपडीवर लक्ष्य ठेऊन होतो.








कशीबशी खिंड पार केली, बरोबर १२.१५  वाजता गडाच्या माथ्यावर जाऊन आडवे झालो. या एका तासात जे चढलो होतो, तेच उतरताना सांभळून करायचे होते.  विशेष म्हणजे हा गड आम्ही १ तासातच पार केला होता.  सर्वांना आनंद होताच, गड सर केल्याचा. आता इथून पुढे काय आहे याची उत्सुकताही होती. हा क्षण टिपला अजिंक्यने.


(बघू काय म्हणतोय फोटो: पपू काका फुल रीलेक्स. प्रज्वलला, पिल्याचा एक फुटाचा पण दुरावा सहन होत नव्हता, आडवाच झाला नाही. मी गेट वर आडवा. ब्रह्म काका, नो इमोशन्स!. पिल्या ओजी खूष! मागे धर्मा दादा निवांत, बब्बू पायांचे आभार मानतोय, परेशची घोरायला सुरुवात, हा बघा… रोहित, ह्याला काय शिवायच नाय… का काय? )

थोडा आराम केला. नशिबाने पावसाचा आक्रोश नव्हता. हिरव्यागार लांबच्या लांब पठारावर परत चालण्यास सुरुवात केली, त्या टोकावर, जिथून कलावंती दुर्ग स्पष्ट दिसेल. धुके चांगलच होत. समोर जंगल. "कही दीप जले, कही दिल" या भयानक गाण्याची ओळ म्हणालो, मागून बब्बूचा आवाज, "दादा, हातात अगरबत्ती घे". परेशनी शब्दाची टपली मारली. "अगरबत्ती, नाही मेणबत्ती".  काळ बदललाय, आपल्याला काळाप्रमाणे वागायला हवं, बब्बूनी सूर लावला. टपली यु टर्न.… असो. जंगलाला पार करून टोकावर जायचं होत. जंगल खूपच घनदाट होते. अंधार होता. सापांची वारुळे होती. गोगल गाईंच्या वसाहती होत्या. संपूर्ण जमीनीवर झाडांची पाने पडून कुजली होती. चिमुकल्या पायवाटेच्या रुळावर धर्मा दादाच्या इंजिनाला आमचे ९ डब्बे जोडले गेले, झुक….झुक…. झुक…. झुक.  आलं एकदाच स्टेशन.

आलो टोकावर. १० मिनिटांच्या या गडद अंधारातून उजेडात येताच, हायसे वाटले. अंडाकृती पाण्याचे डबक नजरेला भिडले, पाणी साठलेले असल्यामुळे हिरव्या रंगाची चादर पसरलेली. बस, पुढे रस्ता संपला. खोल दरी, जणू टकमक टोकच!. समोरच कलावंती दुर्गचा सुळा.  सरळ रेषेत पोर स्थिरावली, आरामली. अधून मधून जोरदार वारा वाहत होता. प्रत्येकजन हा अनुभव मनात नक्कीच साठवत असतील, हे नक्की. होताच, प्रसन्न करणारा परिसर. पहाच.




















असा होता आमचा प्रबळगडावरील ट्रेकिंग अनुभव. अजून बरेच काही आहे. गड उतरताना झालेली दमछाक, त्यातून होणारे विनोद, ओढ्यातील आंगुली, दुपारचे जेवण, आमचा फुटबॉल खेळ, रात्रीची शेकोटी व परतीचा प्रवास व त्यातले अविस्मरणीय प्रसंग.

वेळ झालेय आता एका छोट्याश्या ब्रेक ची, कुठेही जाऊ नका! उघडा डोळे, वाचत रहा …. भटकताना.  
क्रमश: 

Comments

Popular posts from this blog

भाग १ - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड

राजगड - भाग १ Rajgad Trekking Experience in Marathi गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश. वार शुक्रवार, दिनांक ७/९/२०१२ रोजी, दुपारी २.३० वाजता तवेरा गाडीतून आमच्या सफरीला सुरुवात झाली. गाडी घणसोली तून निघून, ब्राम्ह् काका काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन काकांना घेतले, परत त्यांच्या  घरी म्हणजे तुर्भ्याला गेलो. तुर्भ्याला माझ्या सासुरवाडीतून माझ्या सासूने आमच्या प्रवासासाठी गोड पोळ्या बनविल्या होत्या त्या घेऊन,  ब्रम्ह काकांच्या घरी  त्यांची बेग घेतली, परेश आमची वाट पाहत तेथेच होता. दोघांना घेऊन गाडी कळंबोलीला रवाना झाली. तेथे सचिन आमच्या विनंतीला मान न देता त्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर राजगडावर येण्यास तयार झाला होता. त्याचे वडील त्याला म्हणाले होते, राजगडावर तू कदाचित जाशीलहि पण भावांबरोबर जाण्यात वेगळी मजा आहे, तू जा... सचिन आला. मला खूप

भाग - १... सफर वैराडगडची..

नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो.   आता सर करायचा होता वैराडगड.  सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा  गड.    मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली. २२/९/२०१२  वार शनिवार, साय. ६ वाजता  मी, माझी पत्नी मीना व माझी मुलगी गुड्डी चिपळूण वरून सातारा येथील जावली तालुक्यातील म्हसवे या गावी जाण्यासाठी क्वालीस गाडी सुरु केली. कोकणातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा भाताची शेती, पाऊस कमी झालेला तरीही कड्यावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या पाहत गाडी पुढे सरकत होती. गणेशोत्सव असल्याने अधून मधून सार्वजनिक गणपती बापांचे दर्शन होत होते,  अंधार वाढत होता, कुंभार्ली घाट क्रॉस केला, पाटण तालुका सोडला, उंब्रजचा ब्रिज पार करत एक्स्प्रेस वे ला लागलो. बरोबर रात्री ९ वाजता माझ्या सासुरवाडीत दरे करंदी या गावी पोहचलो. माझे साडू,  सागर, शेखर, संतोष आणि मयूर माझी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील बाप्पाचे व गोरीचे दर्शन घेतले,  ट्रेकिंग ला लागणारे सामान एका बेगेत घेतले, माझ्या एकुलत्या एक बायकोचा 

प्र..प्र..प्र..प्रबळगड

(भाग - १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel. प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पानी, तर कुठे साठलेले पानी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून. या वेळेला टीम मध्ये,  मी ,  पपु काका  (टीम कर्नल),  पिल्या  (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात),  अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश . तर फ्रेशर होते  रोहित, बब्बू   आणि खास असा  प्रज्वल . (खास म्हणजे..  मुलान  दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर, च्यायला तो असल्यावर मजाच वेगळी… आणि असायलाच हवी, इतिहासाच्या अभ्यासातील मैदानावरचा तो सचिन तेंडूलकरच. एकदम भारी.. गडावर निघण्याच्या सात दिवस अगोद