Skip to main content

प्र..प्र..प्र..प्रबळगड

(भाग - १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel.


प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पानी, तर कुठे साठलेले पानी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून.

या वेळेला टीम मध्ये, मीपपु काका (टीम कर्नल), पिल्या (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात), अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश. तर फ्रेशर होते रोहित, बब्बू  आणि खास असा प्रज्वल. (खास म्हणजे..  मुलान  दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर, च्यायला तो असल्यावर मजाच वेगळी… आणि असायलाच हवी, इतिहासाच्या अभ्यासातील मैदानावरचा तो सचिन तेंडूलकरच. एकदम भारी..

गडावर निघण्याच्या सात दिवस अगोदर पासूनच एकुलत्या एक बायकोचा, "गेलेच पाहिजे का?" असा जागर सप्ताह सुरु  झाला. अगदी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुद्धा वीणा खाली ठेवलाच नाही. परत  "गेलेच पाहिजे का?"….  हसून मी बोललो, "असे बोललेच्च पाहिजे का?" विण्याची तार छेडली.  ती पण हसली… अगदी गोड तर. सर्व तयारी तिनेच केली, त्यात माझ्या सासूने दिलेली तिळाची चटणी आठवणीने घेतली. सासूने दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी लकीच असते, अगदी बायकोसुद्धा. सगळ्या सामानाची खात्रीजमा करून बायकोचा निरोप घेतला.

वार शुक्रवार, २८ जून २०१३, बरोबर संध्याकाळी ७ च्या दरम्यान घणसोली गाठली. कृजर गाडी टीम सह तयार होती. मामा आले, गाडी सुरु. तुर्भे येथून ब्रह्म काका व रोहीत ला घेऊन, गाडी सानपाडा येथे वळवली, पज्या भाय (प्रज्वल) गेट पेच खडेला था, वो भी फुल्टू  तयारी मे. उस्कोभी उचल्या आणि गाडी मी कोम्ब्या...
आता गाडी सुसाट पामबीच मार्गे थेट कळंबोली. परेश ला घेतले, बस.. आता सर्व टीम गाडीत होती. गाडीने वेग धरत मुंबई -पुणे महामार्ग पकडला, पपु काकांना शेडुंग फाटा माहीत होताच, मस्त लेफ्ट घेतला. आणि जल्ल भरकटलो ना वाइच पुढ जाऊन. ह्यालागाड त्यालागाड…. ओ.. सॉरी सॉरी, ह्यालाफोन त्यालाफोन करू लागलो. फुकटचा एक टोल फाडला, परत दुसरा टोल आला. या टोल वरील कामगारांना विचारले, त्यांची माहिती शून्यात जमा. परत यु टर्न घेतला, शेवटी इकडे तिकडे विचारत तो छोटासा ठाकूरवाडी या गावात जाणारा रस्ता भेटला. आता कुठे या रस्त्याच्या दुतर्फा मस्त गार वारा आणि हिरवळ होती, त्यात रस्त्यावरून धावणारे खेकडे स्वागतासाठी पुढे सरसावले, कितीतरी खेकडे यार. मस्तच.

रात्री ९. ३० वाजता दुरूनच धर्मा दादा (गाईड) ने बेट्रीचा प्रकाशझोत गाडीवर टाकला, चला पोहचलो एकदाचे ठाकूरवाडी या गावात आणि आता घरात. कृजर गाडीला राम राम करून थेट  धर्मा दादाच्या पहिल्या मजल्यावरील घरात.


पहिल्या मजल्यावर चार चौकोनी खोल्या, समान मापाच्या जणू बुद्धिबळाचा पटच. पहिली खोली धर्मा दादाच्या आईची आरक्षित बेडरूम. आम्ही समोरासमोर दोन खोल्या निवडल्या. एकात सिनिअर सिटीझन तर दुसरी आमच्या साठी. सामान ठेऊन, कपडे चेंज केले. धर्मा दादाने ठरविल्याप्रमाणे दोन गावठी कोंबडे आणले होते. जेवायला गावठी चिकन, भाकरी व भात हा बेत ठरला. कोंबडी सोलायला बब्बुने ने पुढाकार घेतला.




परेशचा आदेश आला. "दोन्ही कोंबड्यांची कलेजी चुलीवर भाजून बच्चे कंपनीला देण्यात यावी".  हा खलिता घेऊन मामा वेड्या वाकड्या पायऱ्या उतरून थेट किचनकडे रवाना झाले. इकडे खोलीचा तोवर शामियाना तयार केला,  गोल बसून विचारांची देवाण घेवाण सुरु झाली. बच्चे कंपनीला उपदेशाचे डोस पाजण्यात आले यासाठी गॉड फादर, माफिया, शर्लोक होम्स, पु. ल. देशपांडे, सर्वाना खाली आणले. चर्चेला उधान आले होते.  एवढयात खलिता घेऊन गेलेले मामा,  भाजलेली कलेजी घेऊन शामियानात प्रवेशले. थोडी थोडी कलेजी सर्वांनी पोटात टाकली, छानच होती. रात्री ११ च्या दरम्यान, गरमा गरम जेवण तयार झाले. बच्चे कंपनी प्रथम , नंतर आम्ही गरमागरम जेवणावर ताव मारला. त्याचे फोटोसेशन सुरु केले.



जेवण उरकले, शतपावली साठी खाली येउन मनसोक्त चीरचीरी  पावसात उभे राहून हलक्या थंडीचा आनंद लुटला. सकाळी लवकर उठायचे होते, गड सर करायचा होता, आताची झोप गरजेची होती, सर्वाना घेऊन परत खोलीत गेलो. तो पर्यंत धर्मा दादाने जमिनीवर चटई पसरवली होती, लाईट बंद केली. लाइटची जागा आता काजव्यांनी घेतली, त्या गडद अंधारात काजवे लकाकत होते. हळू…ह…ळू… झो……प लो. 



क्रमश:




Comments

  1. Dear Madam,

    My Name is Nilesh Bhutambre From Prabalgad Village (I am called "Bhau" by those close to me, especially by everyone in my village) I run a small scale tourist service wherein I provide food, lodging facilities and guide services to tourists who visit Prabal Machi.( All Information of Prabalgad and Kalavantin Durg ) The URL of my website is: http://prabalgad.jigsy.com/ .

    With Regards

    Nilesh Bhutambara
    Mob:08056186321

    ReplyDelete
  2. My name is Ankush Goma shid from machiprabal villege. Provide food, Room services, tent services , abolishing facilities, guide services,... From Mahalxmi Hotel prabalgad ...
    With Regards..
    Ankush shid
    8879495521

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भाग १ - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड

राजगड - भाग १ Rajgad Trekking Experience in Marathi गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश. वार शुक्रवार, दिनांक ७/९/२०१२ रोजी, दुपारी २.३० वाजता तवेरा गाडीतून आमच्या सफरीला सुरुवात झाली. गाडी घणसोली तून निघून, ब्राम्ह् काका काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन काकांना घेतले, परत त्यांच्या  घरी म्हणजे तुर्भ्याला गेलो. तुर्भ्याला माझ्या सासुरवाडीतून माझ्या सासूने आमच्या प्रवासासाठी गोड पोळ्या बनविल्या होत्या त्या घेऊन,  ब्रम्ह काकांच्या घरी  त्यांची बेग घेतली, परेश आमची वाट पाहत तेथेच होता. दोघांना घेऊन गाडी कळंबोलीला रवाना झाली. तेथे सचिन आमच्या विनंतीला मान न देता त्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर राजगडावर येण्यास तयार झाला होता. त्याचे वडील त्याला म्हणाले होते, राजगडावर तू कदाचित जाशीलहि पण भावांबरोबर जाण्यात वेगळी मजा आहे, तू जा... सचिन आला. मला खूप

भाग - १... सफर वैराडगडची..

नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो.   आता सर करायचा होता वैराडगड.  सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा  गड.    मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली. २२/९/२०१२  वार शनिवार, साय. ६ वाजता  मी, माझी पत्नी मीना व माझी मुलगी गुड्डी चिपळूण वरून सातारा येथील जावली तालुक्यातील म्हसवे या गावी जाण्यासाठी क्वालीस गाडी सुरु केली. कोकणातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा भाताची शेती, पाऊस कमी झालेला तरीही कड्यावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या पाहत गाडी पुढे सरकत होती. गणेशोत्सव असल्याने अधून मधून सार्वजनिक गणपती बापांचे दर्शन होत होते,  अंधार वाढत होता, कुंभार्ली घाट क्रॉस केला, पाटण तालुका सोडला, उंब्रजचा ब्रिज पार करत एक्स्प्रेस वे ला लागलो. बरोबर रात्री ९ वाजता माझ्या सासुरवाडीत दरे करंदी या गावी पोहचलो. माझे साडू,  सागर, शेखर, संतोष आणि मयूर माझी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील बाप्पाचे व गोरीचे दर्शन घेतले,  ट्रेकिंग ला लागणारे सामान एका बेगेत घेतले, माझ्या एकुलत्या एक बायकोचा