Skip to main content

Posts

Showing posts from September, 2012

भाग - २... सफर वैराडगडची..

भाग १ साठी इथे  टिचकी  मारा दुपारचे जेवण उरकले होते, थोडा वेळ झाडाच्या सावलीत पहुडलो. बाटलीतले पाणी संपले होते, मग सागर, संतोष आणि बिगुल पाणी आणायला परत टाकी जवळ गेले. मी, साडू, शेखर, मयूर व डोंग्या पुढे जाण्याचे ठरवले. आता आम्हांला गडावरील चोर खिंडीतून खाली उतरून जायचे होते. चोर खिंड खूपच निमुळती व थोडी खोल होती. शूज घालून उतरणे शक्यच नव्हते, सर्वांनी शूज काढून दगडांच्या खाचेत पाय रोवत, शरीर दगडावर घासत हळू हळू उतरून खाली आलो. शूज घालून परत पायवाट पकडली. थोडेच अंतर गेल्यावर लक्षात आले डोंग्या कुत्रा वरच राहिला. त्याला खिंडीतून खाली कसा आणायचा याचा विचार करत, त्याला हाका मारू लागलो , हा बहाद्दर कडच्या वरून आम्हांला पहात होता. साडू व संतोष त्याला घेण्यासाठी खिंडीच्या मागील बाजूने पायवाटेने जावू लागले, डोंग्या पण त्याप्रमाणे पुढे पुढे येत होता. शेवटी डोंग्यानेच पुढाकार घेऊन वाट काढत त्यांच्या जवळ आला. तोपर्यंत आम्ही बाकी एका भल्यामोठ्या दगडाच्या कोरीत आराम करत बसलो. आता आम्ही पूर्ण गड पार करून, एका भल्या मोठ्या माळरानात दाखल झालो तो. या माळराना

भाग - १... सफर वैराडगडची..

नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो.   आता सर करायचा होता वैराडगड.  सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा  गड.    मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली. २२/९/२०१२  वार शनिवार, साय. ६ वाजता  मी, माझी पत्नी मीना व माझी मुलगी गुड्डी चिपळूण वरून सातारा येथील जावली तालुक्यातील म्हसवे या गावी जाण्यासाठी क्वालीस गाडी सुरु केली. कोकणातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा भाताची शेती, पाऊस कमी झालेला तरीही कड्यावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या पाहत गाडी पुढे सरकत होती. गणेशोत्सव असल्याने अधून मधून सार्वजनिक गणपती बापांचे दर्शन होत होते,  अंधार वाढत होता, कुंभार्ली घाट क्रॉस केला, पाटण तालुका सोडला, उंब्रजचा ब्रिज पार करत एक्स्प्रेस वे ला लागलो. बरोबर रात्री ९ वाजता माझ्या सासुरवाडीत दरे करंदी या गावी पोहचलो. माझे साडू,  सागर, शेखर, संतोष आणि मयूर माझी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील बाप्पाचे व गोरीचे दर्शन घेतले,  ट्रेकिंग ला लागणारे सामान एका बेगेत घेतले, माझ्या एकुलत्या एक बायकोचा