Skip to main content

Posts

(भाग – ५) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

सकाळी ७.३० वाजता पपु काकांनी आम्हाला गाढ झोपेतून उठवले, कसेबसे उठ्लोही. घाई घाईतच ब्रश, तोंड धुऊन फ्रेश झालो. सामानाची आवरा आवर केली. आता आम्हाला माचीवरील हॉटेल मध्ये नाश्ता करून खाली ठाकूरवाडीला जायचे होते. रात्रभर पडलेल्या पावसामुळे वातावरण बरेच ओलमय झाले होते. हिरवा रंग अधिक गडद झाला होता. ओढे दुधाडी भरून वाहत होते. धुक्यानी गडांचा माथा ताब्यात घेतला होता. धबधबे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले होते. इकडे आमचे पाय खूपच जड जड वाटत होते. शनिवारच्या प्रबळ पायपीटामुळे चालणे मुश्किल झाले होते. शेवरीच्या काठीवर संपूर्ण शरीराचा भार टाकत चालत होतो. तरीही मोहीम यशस्वी झाल्याची ख़ुशी सर्वांनाच होती. १० मिनिटांनी हॉटेलवर पोहचलो. गरमा गरम कांदेपोहे पोटात टाकले, गवतीची चहा चा आस्वाद घेतला. एकदम कडक चहा. निलेशच्या भावाला २ दिवसांच्या त्यांच्या या सेवेचे मानधन दिले, निरोप घेतला आणि हो त्यांच्या बरोबर आठवण म्हणून फोटो हि काढला. (निलेशचे आई व वडील.… 'त्या हॉटेलचे मालक') भ प्रबळमाचीचे अविस्मरणीय रूप मनात साठवून, परत येथे नक्की येण्याच्या आणाभाका करत माची
Recent posts

(भाग – ४) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

प्रबळगडाच्या माथ्यावरील निसर्गाचा आल्हादायक क्षण मनात साठवत होतो. बरोबर दुपारी १. १५  वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. काळे ढग वातावरण बदलवत होते, भराभर पावले टाकत सर केलेली खिंड उतरविण्यास सुरुवात केली. पाय लटलटत होते.  हातातील शेवरीची काठीच आमच्यासाठी वरदान होती, तिचा आधार घेत अवघड खिंड सावकाश उतरत होतो. कठीन उतार बसत बसतच उतरत होतो.  प्रज्वल फुल सेफ्टी मध्ये, पूर्ण खिंड बसूनच उतरला. पिल्या, अजिंक्य फुल जोशातच!!! सर्वांच्या पुढे. पपु काका आणि मी मागे पुढेच होतो, एकमेकाकडे पाहत, पायांच्या व्यथा हसून व्यक्त करत. "चलते  रहो". ब्रह्म काका, पपू काकांच्या मागेच, विथ नो इमोशन्स!!!. बब्बू जजमेंट मध्ये उतरत होता, काठी न घेता. चाललही असते, पण नंतर बाल्या नाच करत उतरु लागला. मी आवाज दिला, 'नीट उतर, परत आणणार नाही". बाल्या नाच लगेच संपला.  तोवर, जवळ जवळ ५० ते ६० जणांचा असे कॉलेजचे २ ग्रुप घेऊन निलेशचे दोन भाऊ गड सर करत होते.  बर्यापैकी मुलीच जास्त होत्या. आमची आणि त्यांची भेट खिंडीच्या अर्ध्यावर झाली. त्यातील काहीजण आम्हाला विचारायचे, "अजून किती वर आहे

(भाग – ३) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

(भाग – १) (भाग – २ ) ठाकूरवाडी गावातून ते प्रबळमाचीवर पोहचायला २ तास लागले होते. बरोबर सकाळी ११.०० वाजता राहण्याची सोय असलेल्या खोलीवर पोहचलो. खोलीच्या आजूबाजूला कौलारू घरे, जवळ जवळ १०-१२ असतील एकमेकाला चिकटून, चारी बाजूनी गर्द भल्या मोठ्या झाडांची संरक्षक भिंती, प्रत्येक घरात एक पाळीव रखवालदार, घरात लग्न सराई असल्यासारख्या गडबडीत चालणाऱ्या कोंबड्या, त्यांच्यावर आरवणारे मर्द  कोंबडे… सुंदरच!!!  लांबलचक ३ खोल्यांचे ते छोटेस होटेलच, खास पर्यटकांसाठी!, पिवळ्या रंगाने रंगविलेल्या, समोरच मोठे आंगण, २ बाथरूम, कुठलीही गैरसोय होणार नाही याची घेतलेली पुरेपूर काळजी. बाळूने दरवाजा उघडून देऊन तो त्याच्या कामात व्यस्त झाला. आत, १ मोठा हॉल, २ बेडरूम, हॉलमध्ये एक बेड व २ सोफा खुर्ची. लगबगीने सर्व समान एक कोपऱ्यात ठेवल्या. काहीजण बेडवर कोसळले, पपु काका खुर्चीत आरामात. बाजूला सवंगडी, ब्रम्ह काका.  खरी ट्रेकिंग इथूनच होती, माचीवरून आता प्रबळगड गाठायचा होता, धर्मा दादाच्या मते एकूण ३-४ तास लागणारे होते, परत यायला. 'सुका खोकल्याचा आवाज आला'.  तीन वाजपर्यंत सर्व परत येण्याचे एकम