Skip to main content

(भाग – २ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

(भाग – २ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

भाग १ साठी येथे टिचकी मारा

वार शनिवार, २९ जून २०१३, सकाळी बरोबर ७.०० वाजता खुडबुड खुडबुड आवाजाने जाग आली. आमचा सिनिअर सिटीझन आधीच जागा झालेला. इकडे यंगिस्तान सकाळच्या गुलाबी थंडीत अजून चादरीखालीच. एका आवाजात पोर उठली. डोळे चोळत समोरच्या खिडकीत उभी राहताच, "आय शपत, आयला… 'काय सोलेड सीन आहे'". मी सुद्धा खिडकीतून डोकावले. आणि फोटो काढावाच लागला. 






खिडकीतून सकाळचे प्रसन्न करणारे हे रूप मनात साठवत होतो. गार वारा शहारे आणत होत. पावसाची शिंतोडे फ्रेश करत होत. गडावर कसे असेल?, काय असेल?, सर्व व्यवस्थित होईल ना? सर्वांना घेऊन तर आलोय, फीयास्को तर होणार नाही नाही ना? गडावर आणखी कोणी पर्यटक असतील का?  प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. नक्कीच हा माझा १०० वा प्रश्न असावा, कारण सहज डोक्यावरुन हात फिरवला, हातात टाळू वरचा एक केस आला, त्याच्या या बलिदानाचे फार वाईट वाटले.  असो… इकडे बब्बुने तोवर दुकानातून फार मोठी म्हणजे जवळ जवळ करंगळी एव्हढी कोलेगेट टूथपेष्ट घेऊन आला. तोंड धुऊन झाले, धर्मा दादाला सर्वांना चहा बनविण्यास सांगितले. तोवर सर्वजण आपापले सामान घेऊन पहिल्या मजल्यावरून खाली आलो. 

आता आम्हाला प्रथम प्रबळमाची या गावात जायचे होते, तेथे जेवणाची आणि राहण्याची सोय ही याच माचीवर होती. अरे हो, हि व्यवस्था जरी मी केली असली तरी खूप मदत केली ती, निलेश भूताम्बर याने. कारण या प्रबळगडाचा तो सुपुत्र. आदिवासी समाजातील या पठ्ठयाने उच्च शिक्षण घेऊन आज तो चेन्नई येथे केंद्रीय  सरकारी सेवेत कार्यरत आहे. फोनवरून आम्ही एकमेकाशी संपर्क साधत असु. 

चहा आटोपला. पपु काकांनी आणलेले केक व बिस्किटे हादडली. एनर्जी आली.  धर्मा दादाला आमचा गाईड म्हणून आमच्या सेवेला रुजू केले. रात्रीच्या सेवेचे त्याला मानधन दिले. गडी खूष!! मधी मधी पाऊस येऊन टपली मारून जायचा.  एव्हढा राग आला म्हणून सांगू, टपली काय मारतो रे, ये ना मारामारीच करू. असे आमच्या यंगीस्थानला वाटत होते. प्रबळमाचीवर जाण्यासाठी २ मार्ग आहेत, एक गावातुन फिरून तर दुसरा १  नदी ओलांडून, अर्थातच मार्ग दुसरा निवडला. पोर खूष! 

गणपती बाप्पा!!! पिल्याने आवाज दिला. आम्ही…जय!!!!  पायवाट सुरु झाली. या गावात काही हौशी लोकांनी बंगले बांधले होते. मस्तच बंगले होते.  हे ओलांडून, नदी, ओढे पार करत, नदीतून एकमेकाला हात देत, सांभाळत पाऊले टाकू लागलो. हिरव्या गार रानवेलीतून मार्ग काढत, या अप्रतिम अनुभवाचा आनंद घेत…. काढले कि फोटो. 












 २० मिनिटांनी, पायवाट संपली. कच्चा रोड सुरु झाला. चढ होता तो, मधेच ब्रेक घेत. फोटो काढत. भराभर पाऊले टाकत होतो. मधेच पावसाची सर येउन घाम धुऊन निघून जायची. परत फ्रेश. चलो. चालतोय…  चालतोय.… एक तासाने संपला कच्चा रोड. सुरु झाली पायवाट. 

चालता चालता प्रत्येकाचे निरीक्षण नकळत झाले… ते असे…. पिल्या आणि प्रज्वल हे हनीमून कपल भासणे अतिशयोक्ती ठरणारी नव्हती. पपु काका शेवरीची काठी जीवापाड सांभाळत तिचा आधार घेत चालत होते, पाय धुखत असले तरी, मनातल्या मनात स्वत: शीच फर्गेटिट यार… बोलत… चलते रहो. अजिंक्य मजेत होता, पण त्याचे डॉक्टरी हावभाव समजणे कठीण होते. ("हा पेशंट माझे बिल देईल का?" या विचारांचे हावभाव जणू).  आपले मामा, बापू… बापू… (त्यांनीच पपू काकांना प्रेमाने दिले होते हे नाव ) करत आलेला कंटाळा लपविण्याचा प्रत्यन करत होते.  ब्रह्म काका ब्रह्म देवासारखे पपू काकांच्या सदैव पाठीशी. परेश ची शेवरीची काठी वजनाचा भार मुकाट्याने सहन करत होती, काही झाले तरी, अतिथी देवो भव:. रोहित सायलेंट मोड वर.  बब्बू नवी नवरी असल्या सारखा खुपच हुरूप वती झाला होता. काय काय आणि कुठून कुठून आवाज काढत होता त्याच त्यालाच महित. आता मी.….मी…. नाय सांगणार… जावा तिकड!!!!. 

पायपीट करून करून पोटातल्या भुकेने तिच्या कवेत घ्यायला सुरुवात केली होती. पण, आजूबाजूच्या हिरव्या गार वातावरणामुळे काही क्षणात भूक विसरायचो. वर पाहिले कि धुक्याचं साम्राज्य,  कलावंती दुर्ग व प्रबळगडाचे प्रबळ रूप,  अधून मधून येणारे काळे ढग, पक्ष्यांचे निरनिराळे आवाज, रानवारा, अचानक दर्शन झाले ते काळ्या दगडात कोरलेली भगव्या रंगाची  श्री गणेश व  श्री बजरंगबली यांच्या प्रतिमा… अप्रतिम होत सगळ.  फोटोच बघा ना!!! 


















८ . १५ वाजता सुरु केलेली पायपीट १०.१५ वाजता, बरोबर २ तासांनी प्रबळमाचीवर स्थिरावली. लांब लचक सपाट पठार, हिरवी गार शाल अंगावर होती, प्रसन्न वाटत होते.  बाजूलाच एक ओढा खळखळ वाहत आम्हांला दुपारी येण्याचे आमंत्रण देत होता… आंगूलीला!!.  समोरच निलेशचे ते अप्रतिम हॉटेल. शिवरीच्या काठ्यांचे कुंपण असलेले सुंदर हॉटेल, २ दांडगे कुत्रे, त्यात १ कुपोषित कुत्र, आम्हाला पाहताच या… या… बोलण्याऐवजी. भो…भो… करायला लागले. लक्षच नाही दिले आम्ही. सरळ चालू लागलो . दारातच निलेश चा मोठा भाऊ, आत घेऊन गेला. आहाहा, मस्तच हॉटेल. सिमेंटने बनविलेले बाके आणि समोर सिमेंटचेच टेबल, नक्षीदार टाईल्स ने सजविलेले. निलेशचा मोठा भाऊने माहिती दिले कि, इथे सलमान खान ३ दिवस, टेन्ट बांधून राहिला होता, त्याच्या बरोबर ५० जणांचा ताफा होता. सलमानने चादरी, साड्या वाटल्या होत्या. एवढ्यात निलेश चे वडील आले, जबरदस्त फिटनेस, गोरे पान. इकडे पोर भुकेने टेबलवर सामान ठेऊन निपचित बसली होती. कांदा पोहे बनविण्यास सांगितले, १० मिनिटात बाळू (निलेश चा लहान भाऊ) गरमा गरम कांदे पोहे, लिंबू घेऊन आला. कांद्या पोह्यातला एक पोहा पण कुणी प्लेट मध्ये ठेवला नाही. हे हॉटेल बघाच! 





आता इथून पुढे आम्हाला सामान घेऊन राहायची सोय असलेल्या रूम मध्ये जायचे होते, तेथून सामान ठेऊन प्रबळगड सर करायचा होता. निलेशच्या वडिलांना दुपारच्या जेवणाचा मेनू सांगून, धर्मा दादा बरोबर रूम वर जाण्यासाठी निघालो, हे अंतर १० मिनिटांचे होते. उत्साह परत आला होता, चालू लागलो, फोटो काढू लागलो. 










क्रमश:

Comments

Popular posts from this blog

भाग १ - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड

राजगड - भाग १ Rajgad Trekking Experience in Marathi गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश. वार शुक्रवार, दिनांक ७/९/२०१२ रोजी, दुपारी २.३० वाजता तवेरा गाडीतून आमच्या सफरीला सुरुवात झाली. गाडी घणसोली तून निघून, ब्राम्ह् काका काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन काकांना घेतले, परत त्यांच्या  घरी म्हणजे तुर्भ्याला गेलो. तुर्भ्याला माझ्या सासुरवाडीतून माझ्या सासूने आमच्या प्रवासासाठी गोड पोळ्या बनविल्या होत्या त्या घेऊन,  ब्रम्ह काकांच्या घरी  त्यांची बेग घेतली, परेश आमची वाट पाहत तेथेच होता. दोघांना घेऊन गाडी कळंबोलीला रवाना झाली. तेथे सचिन आमच्या विनंतीला मान न देता त्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर राजगडावर येण्यास तयार झाला होता. त्याचे वडील त्याला म्हणाले होते, राजगडावर तू कदाचित जाशीलहि पण भावांबरोबर जाण्यात वेगळी मजा आहे, तू जा... सचिन आला. मला खूप

भाग - १... सफर वैराडगडची..

नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो.   आता सर करायचा होता वैराडगड.  सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा  गड.    मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली. २२/९/२०१२  वार शनिवार, साय. ६ वाजता  मी, माझी पत्नी मीना व माझी मुलगी गुड्डी चिपळूण वरून सातारा येथील जावली तालुक्यातील म्हसवे या गावी जाण्यासाठी क्वालीस गाडी सुरु केली. कोकणातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा भाताची शेती, पाऊस कमी झालेला तरीही कड्यावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या पाहत गाडी पुढे सरकत होती. गणेशोत्सव असल्याने अधून मधून सार्वजनिक गणपती बापांचे दर्शन होत होते,  अंधार वाढत होता, कुंभार्ली घाट क्रॉस केला, पाटण तालुका सोडला, उंब्रजचा ब्रिज पार करत एक्स्प्रेस वे ला लागलो. बरोबर रात्री ९ वाजता माझ्या सासुरवाडीत दरे करंदी या गावी पोहचलो. माझे साडू,  सागर, शेखर, संतोष आणि मयूर माझी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील बाप्पाचे व गोरीचे दर्शन घेतले,  ट्रेकिंग ला लागणारे सामान एका बेगेत घेतले, माझ्या एकुलत्या एक बायकोचा 

प्र..प्र..प्र..प्रबळगड

(भाग - १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel. प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पानी, तर कुठे साठलेले पानी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून. या वेळेला टीम मध्ये,  मी ,  पपु काका  (टीम कर्नल),  पिल्या  (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात),  अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश . तर फ्रेशर होते  रोहित, बब्बू   आणि खास असा  प्रज्वल . (खास म्हणजे..  मुलान  दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर, च्यायला तो असल्यावर मजाच वेगळी… आणि असायलाच हवी, इतिहासाच्या अभ्यासातील मैदानावरचा तो सचिन तेंडूलकरच. एकदम भारी.. गडावर निघण्याच्या सात दिवस अगोद