Skip to main content

(भाग – ५) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

सकाळी ७.३० वाजता पपु काकांनी आम्हाला गाढ झोपेतून उठवले, कसेबसे उठ्लोही. घाई घाईतच ब्रश, तोंड धुऊन फ्रेश झालो. सामानाची आवरा आवर केली. आता आम्हाला माचीवरील हॉटेल मध्ये नाश्ता करून खाली ठाकूरवाडीला जायचे होते. रात्रभर पडलेल्या पावसामुळे वातावरण बरेच ओलमय झाले होते. हिरवा रंग अधिक गडद झाला होता. ओढे दुधाडी भरून वाहत होते. धुक्यानी गडांचा माथा ताब्यात घेतला होता. धबधबे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले होते. इकडे आमचे पाय खूपच जड जड वाटत होते. शनिवारच्या प्रबळ पायपीटामुळे चालणे मुश्किल झाले होते. शेवरीच्या काठीवर संपूर्ण शरीराचा भार टाकत चालत होतो. तरीही मोहीम यशस्वी झाल्याची ख़ुशी सर्वांनाच होती.







१० मिनिटांनी हॉटेलवर पोहचलो. गरमा गरम कांदेपोहे पोटात टाकले, गवतीची चहा चा आस्वाद घेतला. एकदम कडक चहा. निलेशच्या भावाला २ दिवसांच्या त्यांच्या या सेवेचे मानधन दिले, निरोप घेतला आणि हो त्यांच्या बरोबर आठवण म्हणून फोटो हि काढला.



(निलेशचे आई व वडील.… 'त्या हॉटेलचे मालक')

प्रबळमाचीचे अविस्मरणीय रूप मनात साठवून, परत येथे नक्की येण्याच्या आणाभाका करत माचीवरून खाली उतरू लागलो. पायं त्रासाने खूपच जड झाले होते. पण गड यशस्वी सर करून परत सुखरूप परतत असल्याने सर्वांच्या मनात आनंद खळखळून वाहत होता, हे नक्की!!. मात्र चेहऱ्यावर अंग दुखीचे सावट होते. प्रत्यक्ष वेदना असतानाही, मन प्रसन्न होते, म्हणूनच वेदना सहन  करण्याची क्षमता आपोआपच येत होती.  आमचे यंगीस्थान सर्वांच्या पुढे जोशात चालत होते.










माचीचा अर्धा रस्ता ओलांडला असू , पाहतो तर काय, शंबराहून अधिक पर्यटक वर येत होते. फुल जोशात! हसत खेळत चढत होते, आमच्याकडे एखाद्या सेलेब्रिटी सारखे पाहत होते. आमची विचारपूस करत होते, गडावरचे अंतर, वेळ विचारत होते. सर्वांना "शेवरीची काठी घ्या" "शेवरीची काठी घ्या" असे बजावून सांगत होतो. आमच्या जवळीलही काठ्या त्यांना दिल्या. एक प्रोफेशनल छायाचीत्रकार लांबूनच आमच्या कोमजलेल्या छायेची चित्र काढत होता. एक लांबलचक  मुलांची रांग, हातात झाडांची रोपे गडावर लावण्याकरिता घेऊन येत होतो, त्यांची पाठ थोपटत, पपु काकांना पुढच्यावेळी आपणही प्रत्येक ट्रेकिंग झाडांची रोपे घेऊनच करायची असे सांगितले.

थोडे अंतर पार केल्यावर, एक रांग परत दिसली, त्यात एका तरुणाची लांबलचक तांबडी केस सेम टू सेम सिंहाचा शेप दिलेला. मी म्हटले, च्यायला परत खाली येताना नक्कीच याचा आंबेडा झालेला असेल!!! हश्या!!!

मी, परेश व बब्बू आरामशीर, एकमेकाला उसनवारी धीर देत पावले टाकत होतो. वर जाणाऱ्या पर्यटकांना शुभेच्छा देत कसेबसे चालत होतो. तरीही, या अवस्थेत चालू झाली आमची, कॉमेडी एक्स्प्रेस, विदाउट तिकीट फुल टाईमपास… तो असा.

[ गडाच्या पायथ्यापासून रस्त्याच्या दुतर्फा सूचना फलक लावण्याची कल्पना सुचली!!! वर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पहिला फलक असेल "आपले पाय हिच आपली संपत्ती , तिचा जपून वापर करा".  दुसरा फलक असेल, "अति घाई, थकव्यात नेई" तर विरुद्ध बाजूला फलक असेल "आलात? आभारी आहे". तिसरा फलक असेल "केलरीज + २०००" हिरव्या अक्षरात तर त्याच्या विरुद्ध बाजूला फलक असेल "केलरीज - २०००" लाल अक्षरात. चौथा फलक असेल "वेग ताशी ८०" तर विरुद्ध बाजूला "बोर्डच नसेल". चाला जसं जमेल तसं!!]

कच्चा रस्ता संपून, डांबरी रोड उतरत ठाकूरवाडीला आलो, टमटम रिक्षा आली. रवाना झालो थेट पनवेल आणि नंतर घरी!!! सुखरूप.

प्रिय, निलेश

खूप आभारी आहे तुझा. जे पाहिलं, अनुभवल ते सर्व काही उतरवल शब्दातून.  यापुढेही आम्ही प्रबळगड नक्कीच अनुभवू, यात शंका नाही.

तुझा मित्र!
किरण शिंदे

अरे हो, तुम्हाला जर प्रबळगडावर जायचे असेल तर संपर्क करा, निलेश व त्यांच्या वडिलांना खालील संकेतस्थळावर.

http://nileshprabalgad.blogspot.in/2013/03/blog-post.html


Comments

  1. Nice Kiran.........
    arrr malapan sag jatana jamla tar me pan yaen sagati...........

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भाग १ - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड

राजगड - भाग १ Rajgad Trekking Experience in Marathi गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश. वार शुक्रवार, दिनांक ७/९/२०१२ रोजी, दुपारी २.३० वाजता तवेरा गाडीतून आमच्या सफरीला सुरुवात झाली. गाडी घणसोली तून निघून, ब्राम्ह् काका काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन काकांना घेतले, परत त्यांच्या  घरी म्हणजे तुर्भ्याला गेलो. तुर्भ्याला माझ्या सासुरवाडीतून माझ्या सासूने आमच्या प्रवासासाठी गोड पोळ्या बनविल्या होत्या त्या घेऊन,  ब्रम्ह काकांच्या घरी  त्यांची बेग घेतली, परेश आमची वाट पाहत तेथेच होता. दोघांना घेऊन गाडी कळंबोलीला रवाना झाली. तेथे सचिन आमच्या विनंतीला मान न देता त्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर राजगडावर येण्यास तयार झाला होता. त्याचे वडील त्याला म्हणाले होते, राजगडावर तू कदाचित जाशीलहि पण भावांबरोबर जाण्यात वेगळी मजा आहे, तू जा... सचिन आला. मला खूप

भाग - १... सफर वैराडगडची..

नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो.   आता सर करायचा होता वैराडगड.  सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा  गड.    मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली. २२/९/२०१२  वार शनिवार, साय. ६ वाजता  मी, माझी पत्नी मीना व माझी मुलगी गुड्डी चिपळूण वरून सातारा येथील जावली तालुक्यातील म्हसवे या गावी जाण्यासाठी क्वालीस गाडी सुरु केली. कोकणातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा भाताची शेती, पाऊस कमी झालेला तरीही कड्यावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या पाहत गाडी पुढे सरकत होती. गणेशोत्सव असल्याने अधून मधून सार्वजनिक गणपती बापांचे दर्शन होत होते,  अंधार वाढत होता, कुंभार्ली घाट क्रॉस केला, पाटण तालुका सोडला, उंब्रजचा ब्रिज पार करत एक्स्प्रेस वे ला लागलो. बरोबर रात्री ९ वाजता माझ्या सासुरवाडीत दरे करंदी या गावी पोहचलो. माझे साडू,  सागर, शेखर, संतोष आणि मयूर माझी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील बाप्पाचे व गोरीचे दर्शन घेतले,  ट्रेकिंग ला लागणारे सामान एका बेगेत घेतले, माझ्या एकुलत्या एक बायकोचा 

प्र..प्र..प्र..प्रबळगड

(भाग - १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel. प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पानी, तर कुठे साठलेले पानी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून. या वेळेला टीम मध्ये,  मी ,  पपु काका  (टीम कर्नल),  पिल्या  (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात),  अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश . तर फ्रेशर होते  रोहित, बब्बू   आणि खास असा  प्रज्वल . (खास म्हणजे..  मुलान  दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर, च्यायला तो असल्यावर मजाच वेगळी… आणि असायलाच हवी, इतिहासाच्या अभ्यासातील मैदानावरचा तो सचिन तेंडूलकरच. एकदम भारी.. गडावर निघण्याच्या सात दिवस अगोद