Skip to main content

भाग - २... सफर वैराडगडची..



भाग १ साठी इथे टिचकी मारा


दुपारचे जेवण उरकले होते, थोडा वेळ झाडाच्या सावलीत पहुडलो. बाटलीतले पाणी संपले होते, मग सागर, संतोष आणि बिगुल पाणी आणायला परत टाकी जवळ गेले. मी, साडू, शेखर, मयूर व डोंग्या पुढे जाण्याचे ठरवले. आता आम्हांला गडावरील चोर खिंडीतून खाली उतरून जायचे होते. चोर खिंड खूपच निमुळती व थोडी खोल होती. शूज घालून उतरणे शक्यच नव्हते, सर्वांनी शूज काढून दगडांच्या खाचेत पाय रोवत, शरीर दगडावर घासत हळू हळू उतरून खाली आलो. शूज घालून परत पायवाट पकडली. थोडेच अंतर गेल्यावर लक्षात आले डोंग्या कुत्रा वरच राहिला. त्याला खिंडीतून खाली कसा आणायचा याचा विचार करत, त्याला हाका मारू लागलो , हा बहाद्दर कडच्या वरून आम्हांला पहात होता. साडू व संतोष त्याला घेण्यासाठी खिंडीच्या मागील बाजूने पायवाटेने जावू लागले, डोंग्या पण त्याप्रमाणे पुढे पुढे येत होता. शेवटी डोंग्यानेच पुढाकार घेऊन वाट काढत त्यांच्या जवळ आला. तोपर्यंत आम्ही बाकी एका भल्यामोठ्या दगडाच्या कोरीत आराम करत बसलो.












आता आम्ही पूर्ण गड पार करून, एका भल्या मोठ्या माळरानात दाखल झालो तो. या माळरानात क्रिकेटचे दोन स्टेडियम सहज बनतील. हिरेगार, ३ छोटी तलाव. ८०-९० बकर्यांचा कळप दिसला, त्या दिशेन जावू लागलो. गुराखी साडूंच्या ओळखीचेच निघाले, जवळच असलेल्या वटवृक्ष होता, त्याच्या सावलीत गप्पा मारीत १ तास घालविला. माळावरील फोटो पहाच!



































आता बराच आराम केला होता. गडाच्या लगोलग असणाऱ्या एका पायवाटेने सरळ खाली उतरून परत म्हसवे गावी परतायचे  होते. सर्वांनी पाणी पिऊन परतीचा मार्ग पकडला. रस्ता खूपच उतरणीचा होता. सांभाळून व सावकाश पाय टाकत त्या काटेरी झाडाझुडपातून चालत होतो. रान डुकराने आपल्या  शिंगाने उकरून काढलेले मातीचे ढिगारे पाहत चालत राहिलो. या रान वेलीत बरीच ओषधी वनस्पती  दिसल्या.  त्यातली चोरटी नावाची बारीक दाणे असलेली वनस्पती काढली, पित्ताचा त्रास बरा होतो अशी साडूंनी माहिती दिली. भाजकी नावाची वनस्पती पहिली, जळलेल्या जागी भाजकीची पाने, लोणी यांचे मिश्रण करून त्याचा लेप भाजलेल्या जागी लावल्यावर जखम २-३ दिवसात बरी होऊन डाग सुद्धा राहत नाही.

चोरटी नावाची बारीक दाणे असलेली वनस्पती 

 भाजकी नावाची वनस्पती


साडूंकडून माहिती घेत उतार उतरत होतो. थोडा रस्ता चुकलो, पण असो मजा येत होती. मधेच पाण्याच्या झरा लागला, इथे वाघ पाणी पितात. थंडगार पाणी पिऊन घेतले, तोंड धुऊन उतरणीला लागलो. बराचवेळ चालत शेवटी साडूंच्या शेतात उतरलो, परत उरलेली भाकरी, चटणी खाल्ली. फ्रेश झालो. आता इथे साय. ५ वाजले होते. शेतात काळी चवळी नुकतीच डोक वर काढत होती. शेताच्या बांधावर सीताफळ, बोरे यांची झाडे होती. एक पिशवी भरून पिकलेले सीताफळे काढली. माझ्या बायकोसाठी पानांचे द्रोण तयार करून त्यात बोर काढली. बाजरीच्या शेतात फिरत परत एकदा सुखरूप घरी पोहचलो. 










Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्र..प्र..प्र..प्रबळगड

(भाग - १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel. प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पानी, तर कुठे साठलेले पानी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून. या वेळेला टीम मध्ये,  मी ,  पपु काका  (टीम कर्नल),  पिल्या  (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात),  अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश . तर फ्रेशर होते  रोहित, बब्बू   आणि खास असा  प्रज्वल . (खास म्हणजे..  मुलान  दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर...

भाग १ - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड

राजगड - भाग १ Rajgad Trekking Experience in Marathi गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश. वार शुक्रवार, दिनांक ७/९/२०१२ रोजी, दुपारी २.३० वाजता तवेरा गाडीतून आमच्या सफरीला सुरुवात झाली. गाडी घणसोली तून निघून, ब्राम्ह् काका काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन काकांना घेतले, परत त्यांच्या  घरी म्हणजे तुर्भ्याला गेलो. तुर्भ्याला माझ्या सासुरवाडीतून माझ्या सासूने आमच्या प्रवासासाठी गोड पोळ्या बनविल्या होत्या त्या घेऊन,  ब्रम्ह काकांच्या घरी  त्यांची बेग घेतली, परेश आमची वाट पाहत तेथेच होता. दोघांना घेऊन गाडी कळंबोलीला रवाना झाली. तेथे सचिन आमच्या विनंतीला मान न देता त्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर राजगडावर येण्यास तयार झाला होता. त्याचे वडील त्याला म्हणाले होते, राजगडावर तू कदाचित जाशीलहि ...