Skip to main content

Posts

Showing posts with the label Rajgad Trek Marathi Article

भाग 2 - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड

राजगड - भाग २ भाग १ साठी इथे टिचकी मारा Rajgad Trekking Experience in Marathi गाईड आकाश आपले काम चोखपणे करत होता. मंदिरातील ओलसरपणा कमी करून तो जमिनीवर अंथरण्यासाठी प्लास्टिक शीट घेऊन आला, तोपर्यंत राजगडावरील वरच्या बाजूस असणाऱ्या एका गावातून २ धनगर मंदिरातील दोन कोपरे अडवून बसले, हे धनगर राजगडावरील येणाऱ्या पाहुण्यांना चहा, कांदा पोहे,  पिटले भाकरी बनवून देत. दर शनिवार व रविवार या धनगरांचा  नेहमीचा धंदा. एकाचे नाव होते लक्ष्मण तर दुसरा गणेश. शरीरयष्टी अगदी किरकोळ, पण काटकपणा अंगात ठासून भरलेला, भारदस्त आवाज. सहज शिक्षण विचारले, अर्थातच शिक्षण शून्य होते. दोघेही सख्खे भाऊ, लग्न झालेले, दोघांना ४-४ मुले, मात्र दोघांच्या चुली वेगळ्या. सुसंस्कृत समाजाची कीड इथेही लागलेली... असो.. आपला विषय वेगळा आहे. बाहेर धुके, पाऊस जोर धरत होता. निसर्गप्रेमेंची संख्या वाढत होती. धनगर लक्ष्मण व गणेश, बोला चहा.. कांदा पोहे... गरम गरम पिटले भाकरी..बोला .... असे ओरडत आपला धंदा करण्यात व्यस्त झाले. दुपारचे २ वाजून गेले होते. भूक ला...

भाग १ - हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा राजगड

राजगड - भाग १ Rajgad Trekking Experience in Marathi गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश. वार शुक्रवार, दिनांक ७/९/२०१२ रोजी, दुपारी २.३० वाजता तवेरा गाडीतून आमच्या सफरीला सुरुवात झाली. गाडी घणसोली तून निघून, ब्राम्ह् काका काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन काकांना घेतले, परत त्यांच्या  घरी म्हणजे तुर्भ्याला गेलो. तुर्भ्याला माझ्या सासुरवाडीतून माझ्या सासूने आमच्या प्रवासासाठी गोड पोळ्या बनविल्या होत्या त्या घेऊन,  ब्रम्ह काकांच्या घरी  त्यांची बेग घेतली, परेश आमची वाट पाहत तेथेच होता. दोघांना घेऊन गाडी कळंबोलीला रवाना झाली. तेथे सचिन आमच्या विनंतीला मान न देता त्याच्या वडिलांच्या आग्रहाखातर राजगडावर येण्यास तयार झाला होता. त्याचे वडील त्याला म्हणाले होते, राजगडावर तू कदाचित जाशीलहि ...