Skip to main content

डेरी ट्रेकिंग - इंदवली, पुणे

डेरी  ट्रेकिंग - इंदवली, सातारा.
ट्रेकर्स : किरण शिंदे, योगेश निकम आणि अमित गोगावले

स्थळ : इंदवली, सातारा.
(पाचवड पासून १५ कि.मी. अंतरावर)









































































Comments

  1. प्रबळगड आणि कलावंती दुर्ग बघितला आहे किवा पाहायचा आहे अशा हौशी पर्यटक मित्रांना, हा ट्रेक आणि निसर्ग सौंदर्यपूर्ण परिसर कसा अनुभवायचा? याच्याबद्दल माझे स्थानिक मत..
    तुम्ही दीड तास पायपिट करून प्रबळ माची या गावामध्ये पोहचत. त्यावेळी तुम्ही खूप दमलेले असतात. मग कलावंतीण किवा प्रबळगडामधील एखादे ठिकाण बघून तुम्ही परत जातात. पण जर कलावंतीण तसेच प्रबळगड आणि आजूबाजूचा स्थानिक परिसर जर पूर्णपणेअनुभवायचा असेल तर मी एक स्थानिक म्हणून मार्गदर्शन नक्कीच देईन. तुम्ही एक रात्र गावामध्ये राहा. सकाळी माची गावामध्ये पोहचल्यावर चहा नास्ता करून कलावंतीण दुर्ग पाहायला जा आणि पुन्हा गावामध्ये आल्यावर गावाच्या उजवीकडे असणारे शिवशंकराचे मंदिर पाहू शकतात. गावाच्या कड्यावरून दिसणारा सुर्यास्त हे तर अदभूतपूर्व दृश्य आहे हे अनुभवा, संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पायखाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि त्यावर चमचमणा-या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. त्या सारखा आनंद जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स देऊ शकणार नाही. विशेषकरून गावाच्या कड्यावरून रात्री लग्नसराईच्या लाईटिंगच्या प्रमाणे चमकणारे मुंबई शहर, रसायनी, पनवेल आणि आजुबजुचा प्रदेश कसा नटलेला दिसतो. त्यामुळे असा भास होतो कि शाही लग्नाचा समारंभ आहे, संध्याकाळचा हाडं गोठवणारा गारठा, रानवारा. मग याच्यापुढे एसी नक्कीच फिक्का पडेल. पावसात कड्यावरून समुद्राकडे घाई-घाईने वाट काढत जाणारे धोधो कोसळणारे धबधबे, शिवाय दुसऱ्या दिवशी प्रबळगड ट्रेकला जा. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा
    जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेशमंदिर आहे. तसेच चार पाच पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. प्रबळगडावर अनेक बुरुज आहेत. तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारखी ठिकाणी आहेत, काळ्याभूरुजावर एक मोठा चुन्याचा ढीग आहे. हा चुन्याचा ढीग भूरुज बांधण्यासाठी पूर्वी वापर करण्यात आला असेल असे वाटते. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट जंगल असल्याने हे सगळे बघणे वाटाड्याची गरज भासते. गडावरून माथेरान, मोरबे धरण, तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारख्या ठिकाणाचे विविध पाँईंटस् फार सुंदर दिसतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड,कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. हे सगळे पाहून झाल्यावर पुन्हा माचीगावात येऊन थोडा आराम करून संध्याकाळची बस पकडून परतीचा मार्ग धरावा. यामुळे तुमचा प्रबळगड आणि कलावंतीण ट्रेक तर होईलच पण आजूबाजूचा निसर्ग परिसराचा आनंद पण मिळेल. त्यामुळे ट्रेकच्या निमिताने एक पिकनिक चा अनुभव नक्कीच येईल असे मला तरी वाटते.
    More Detail ;- http://prabalgad.blogspot.in/

    ReplyDelete
  2. धन्यवाद निलेश. प्रबळगड आणि कलावंती दुर्ग पाहण्यासाठी तयारी करताना तुझ्याशी संपर्क साधू.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भाग - १... सफर वैराडगडची..

नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो.   आता सर करायचा होता वैराडगड.  सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा  गड.    मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली. २२/९/२०१२  वार शनिवार, साय. ६ वाजता  मी, माझी पत्नी मीना व माझी मुलगी गुड्डी चिपळूण वरून सातारा येथील जावली तालुक्यातील म्हसवे या गावी जाण्यासाठी क्वालीस गाडी सुरु केली. कोकणातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा भाताची शेती, पाऊस कमी झालेला तरीही कड्यावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या पाहत गाडी पुढे सरकत होती. गणेशोत्सव असल्याने अधून मधून सार्वजनिक गणपती बापांचे दर्शन होत होते,  अंधार वाढत होता, कुंभार्ली घाट क्रॉस केला, पाटण तालुका सोडला, उंब्रजचा ब्रिज पार करत एक्स्प्रेस वे ला लागलो. बरोबर रात्री ९ वाजता माझ्या सासुरवाडीत दरे करंदी या गावी पोहचलो. माझे साडू,  सागर, शेखर, संतोष आणि मयूर माझी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील बाप्पाचे व गोरीचे ...

प्र..प्र..प्र..प्रबळगड

(भाग - १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel. प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पानी, तर कुठे साठलेले पानी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून. या वेळेला टीम मध्ये,  मी ,  पपु काका  (टीम कर्नल),  पिल्या  (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात),  अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश . तर फ्रेशर होते  रोहित, बब्बू   आणि खास असा  प्रज्वल . (खास म्हणजे..  मुलान  दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर...

भाग - २... सफर वैराडगडची..

भाग १ साठी इथे  टिचकी  मारा दुपारचे जेवण उरकले होते, थोडा वेळ झाडाच्या सावलीत पहुडलो. बाटलीतले पाणी संपले होते, मग सागर, संतोष आणि बिगुल पाणी आणायला परत टाकी जवळ गेले. मी, साडू, शेखर, मयूर व डोंग्या पुढे जाण्याचे ठरवले. आता आम्हांला गडावरील चोर खिंडीतून खाली उतरून जायचे होते. चोर खिंड खूपच निमुळती व थोडी खोल होती. शूज घालून उतरणे शक्यच नव्हते, सर्वांनी शूज काढून दगडांच्या खाचेत पाय रोवत, शरीर दगडावर घासत हळू हळू उतरून खाली आलो. शूज घालून परत पायवाट पकडली. थोडेच अंतर गेल्यावर लक्षात आले डोंग्या कुत्रा वरच राहिला. त्याला खिंडीतून खाली कसा आणायचा याचा विचार करत, त्याला हाका मारू लागलो , हा बहाद्दर कडच्या वरून आम्हांला पहात होता. साडू व संतोष त्याला घेण्यासाठी खिंडीच्या मागील बाजूने पायवाटेने जावू लागले, डोंग्या पण त्याप्रमाणे पुढे पुढे येत होता. शेवटी डोंग्यानेच पुढाकार घेऊन वाट काढत त्यांच्या जवळ आला. तोपर्यंत आम्ही बाकी एका भल्यामोठ्या दगडाच्या कोरीत आराम करत बसलो. आता आम्ही पूर्ण गड पार करून, एका भल्या मोठ्या माळरानात दाखल ...