(भाग – २ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel भाग १ साठी येथे टिचकी मारा वार शनिवार, २९ जून २०१३, सकाळी बरोबर ७.०० वाजता खुडबुड खुडबुड आवाजाने जाग आली. आमचा सिनिअर सिटीझन आधीच जागा झालेला. इकडे यंगिस्तान सकाळच्या गुलाबी थंडीत अजून चादरीखालीच. एका आवाजात पोर उठली. डोळे चोळत समोरच्या खिडकीत उभी राहताच, "आय शपत, आयला… 'काय सोलेड सीन आहे'". मी सुद्धा खिडकीतून डोकावले. आणि फोटो काढावाच लागला. खिडकीतून सकाळचे प्रसन्न करणारे हे रूप मनात साठवत होतो. गार वारा शहारे आणत होत. पावसाची शिंतोडे फ्रेश करत होत. गडावर कसे असेल?, काय असेल?, सर्व व्यवस्थित होईल ना? सर्वांना घेऊन तर आलोय, फीयास्को तर होणार नाही नाही ना? गडावर आणखी कोणी पर्यटक असतील का? प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. नक्कीच हा माझा १०० वा प्रश्न असावा, कारण सहज डोक्यावरुन हात फिरवला, हातात टाळू वरचा एक केस आला, त्याच्या या बलिदानाचे फार वाईट वाटले. असो… इकडे बब्बुने तोवर दुकानातून फार मोठी म्हणजे जवळ जवळ करंगळी एव्हढी कोलेगे...